अमेरिकेत एका वृद्ध शिख व्यक्तीला 'लादेन' म्हणून भर रस्त्यात मारहाण

अमेरिकेत एक लाजवणारी घटना घडलीय. एका वृद्ध शिख व्यक्तीला लोकांनी ओसामा बिन लादेन आणि दहशतवादी म्हणत खूप मारहाण केली. घटना शिकागोची आहे.

Updated: Sep 10, 2015, 11:17 AM IST
अमेरिकेत एका वृद्ध शिख व्यक्तीला 'लादेन' म्हणून भर रस्त्यात मारहाण title=

शिकागो: अमेरिकेत एक लाजवणारी घटना घडलीय. एका वृद्ध शिख व्यक्तीला लोकांनी ओसामा बिन लादेन आणि दहशतवादी म्हणत खूप मारहाण केली. घटना शिकागोची आहे.

इंदरजीत मुक्कर नावाचे हे व्यक्ती अमेरिकन नागरिकाच्या दुकानातून काही खरेदी करून जात होते. तेव्हा कास एवेन्यूवर एका ड्रायव्हरनं या दोन मुलांच्या पित्यासोबत दुर्व्यवहार केला. इंदरजीत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण ड्रायव्हर थांबला नाही. 

आरोपी ड्रायव्हरनं मुक्कर यांच्या गाडीला पहिले धडक मारली आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला. ड्रायव्हर आपल्या कारमधून उतरून इंदरजीतच्या कारजवळ पोहोचला आणि त्यांना बाहेर काढून मारहाण केली. या दरम्यान आरोपीनं त्यांना ओसामा बिन लादेश आणि दहशतवादी पण म्हटलंय इंदरजीत यांना गंभीर जखमा झाल्या आहेत आणि त्यांची काही हाडं सुद्धा फ्रॅक्चर झाले आहेत.

दरम्यान घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. शिख समुदायाचे लिगल डायरेक्टर हरसिंरन कौर यांनी सांगितलं, 'इंदरजीतवर जो हल्ला झाला त्याचं कारण शिख असणं आहे. आम्ही स्थानिक पोलीस आणि तपास यंत्रणांना या केसमध्ये द्वेषातून केलेल्या गुन्हा अंतर्गतही तपास करण्याची मागणी केलीय.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.