अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवादी हल्ला, तालिबानने घेतली जबाबदारी

अफगाणिस्तानच्या संसदेवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. संसदेत गोळीबार आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलीय. एकामागून एक सहा स्फोटांनी अफगाणिस्तान संसद हादरलीय. 

Updated: Jun 22, 2015, 01:16 PM IST
अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवादी हल्ला, तालिबानने घेतली जबाबदारी title=

काबूल: अफगाणिस्तानच्या संसदेवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. संसदेत गोळीबार आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलीय. एकामागून एक सहा स्फोटांनी अफगाणिस्तान संसद हादरलीय. 

संसदेच्या आतून मोठमोठे आवाज आणि धूर येत असल्याचं पाहायला मिळालंय. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं असल्याचंही सांगण्यात येतंय. अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयानं या हल्ल्याबाबत पुष्टी केलीय. 

या हल्ल्यात अनेक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या हल्ल्यानंतर आयबीनं भारतातही अलर्ट जारी केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.