इस्लामाबाद: पाकिस्तानची साहसी मुलगी मलाला युसुफजाई हिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दहा आरोपींना पाकिस्तानच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
स्वात खोऱ्यातील दहशतवादी विरोधी न्यायालयाने आणखी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपिंना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक झाली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या आर्मी पब्लिक स्कुलवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील मृत्युदंडाच्या शिक्षेवरील बंदी हटवण्यात आली होती.
तालिबानमधील फतव्याची कोणतीही पर्वा न करता १४ वर्षांची मलाला ९ ऑक्टोबरला शाळेत गेली होती. तेथे अतिरेक्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात मलालाच्या डोक्याला गोळी लागली होती, मात्र त्यातून ती बचावली होती. दोन महिने तिच्यावर ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १० ऑक्टोबर २०१४ रोजी तिला नोबेल शांती पूरस्काराने गौरवण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.