मॉस्को : रशियाचे अब्जाधीश इलखोम शोकिराव यांच्या मुलीचे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरलेय. लग्नाचे रिसेप्शन मॉस्कोतील सर्वात अलिशान पार्क हॉटेलमध्ये पार पडले.
तब्बल 900 पाहुण्यांनी या शाही लग्नास हजेरी लावली होती. लग्नात नवरीच्या ड्रेसची किंमतच तब्बल 4 कोटी 26 लाख रुपये होती. यावरुनच हे लग्न किती शाही असेल याचा तुम्हाला अंदाज येईल.
या लग्नातील केक तब्बल 10 फूट उंचीचा होता. रिसेप्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजानासाठी तब्बल 3 कोटी 16 लाख रुपये खर्च करण्यात आले.
लग्नाचा सर्व खर्च इलखोम यांनी केलाय. इलखोम यांच्या उझबेकिस्तानमध्ये लक्झरी हॉटेल, शॉपिंग सेंटर्स आहेत.