फोटो : पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार

 दक्षिण आफ्रिकेचे क्रुजर राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटकांनी दोन सिंहानी एका काळवीटाशी शिकार लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 14, 2015, 10:19 PM IST
 फोटो : पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार title=
Picture: Carolyn Dunford/Barcroft

 केप टाऊन :  दक्षिण आफ्रिकेचे क्रुजर राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटकांनी दोन सिंहानी एका काळवीटाशी शिकार लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवला. 

 या राष्ट्रीय उद्यानात वाघ, सिंह आणि अनेक हिंस्र प्राणी आहेत. पर्यटक असेच लायन आणि टायगर सफारी करत असताना अचानक त्यांच्या कार समोर दोन सिंह आले. पर्यटकांनी कार थांबविल्या.. हा सर्व प्रकार कारपासून काही फूटांवर घडत होतं. काही हौशी पर्यटकांनी याचे सर्व फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. 
 
 सिंह एका काळवीटाचा पाठलाग करत रस्त्यावर आले होते. त्यांनी त्या काळवीटाची झडप घेतली. त्याला खाली रस्त्यावर पाडले. आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि त्याची शिकार केली. 
 
 हे सर्व त्या पर्यटकांच्या समोर घडत होतं. 


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.