मुंबई : ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत. या संवादामध्ये आयसिसवर आधारीत पोस्ट्सचा समावेश होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरच्या माध्यमातून दहशतवादावर बोललं जात असून यामध्ये प्रामुख्याने इस्लामिक राज्यांचा समावेश आहे. दहशतवादी हल्यांच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळे अशाप्रकारे दहशतवादी संवाद होत असलेले ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.