विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही - ब्रिटन

विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही, असं ब्रिटननं कळवलंय. मात्र त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंतीचा विचार होऊ शकतो, असंही ब्रिटिश सरकारनं भारताला सांगितलंय. 9 हजार कोटींच्या कर्ज प्रकरणी मल्ल्या फरार आहे. त्याच्यावर अफरातफरीचा गुन्हा तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी झालंय. त्याचा पासपोर्टही केंद्र सरकारनं रद्द केलाय. मात्र ब्रिटनच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जेव्हा देशात प्रवेश करताना पासपोर्ट वैध असेल, तर त्यानंतर कितीही कालावधीसाठी ती व्यक्ती ब्रिटनमध्ये राहू शकते. त्यामुळे तिथल्या इमिग्रेशन कायद्यानुसार मल्ल्याचं हस्तांतरण होऊ शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलंय. 

Updated: May 11, 2016, 01:19 PM IST
विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही - ब्रिटन title=

मुंबई : विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही, असं ब्रिटननं कळवलंय. मात्र त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंतीचा विचार होऊ शकतो, असंही ब्रिटिश सरकारनं भारताला सांगितलंय. 9 हजार कोटींच्या कर्ज प्रकरणी मल्ल्या फरार आहे. त्याच्यावर अफरातफरीचा गुन्हा तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी झालंय. त्याचा पासपोर्टही केंद्र सरकारनं रद्द केलाय. मात्र ब्रिटनच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जेव्हा देशात प्रवेश करताना पासपोर्ट वैध असेल, तर त्यानंतर कितीही कालावधीसाठी ती व्यक्ती ब्रिटनमध्ये राहू शकते. त्यामुळे तिथल्या इमिग्रेशन कायद्यानुसार मल्ल्याचं हस्तांतरण होऊ शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलंय. 

केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही याबाबत राज्यसभेत माहिती दिली आहे. 1993 साली दोन्ही देशांमध्ये झालेल्या हस्तांतरण करारानुसार मल्ल्या याला अटक करून त्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं, असंही ब्रिटिश सरकारनं स्पष्ट केलंय. असं असलं तरी ही प्रक्रिया किचकट असल्यानं भारत सरकार हस्तांतरणाचा सोपा मार्ग अवलंबण्याच्या प्रयत्नात आहे.