१५ व्या मजल्यावरून पडूनही तो जिवंत

`देव तारी त्याला कोण मारी`, असं म्हणतात ते खऱचं. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हे सिध्द झालं आहे.. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही जीव सुरक्षित. टॉम स्टिलवेल हा २० वर्षीय तरुण त्याच्या शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या बाल्कनीत जाताना पंधराव्या मजल्यावरुन पडला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 18, 2013, 01:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
`देव तारी त्याला कोण मारी`, असं म्हणतात ते खऱचं. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हे सिध्द झालं आहे.. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही जीव सुरक्षित. टॉम स्टिलवेल हा २० वर्षीय तरुण त्याच्या शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या बाल्कनीत जाताना पंधराव्या मजल्यावरुन पडला.
स्टिलवेलच्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याचा जीव सुरक्षित असला तरी त्याला मुका मार लागला असून काही अवयवांतील हाडही मोडली आहेत. त्याचा फ्लॅट आतून बंद असल्यामुळे तो शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या फ्लॅटमध्ये जाताना तेथून पडला. तो त्याच्या वर्किंग हॉलिडेसाठी तेथे आला होता.

आपल्या फ्लॅटमध्ये माझ्या बाल्कनीतून जाण्यासाठी विनंती केली, पण मला माहीत नव्हते की, तो अशाप्रकारे उडी मारुन जाण्याचा प्रयत्न करेल’ असे त्याच्या शेजारणीचे म्हणणे आहे. चिकित्सक टोनी स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या उंचावरुन पडून जीव वाचणे अशक्यच आहे. त्यामुळेच या घटनेने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.