अमेरिका कारवाईत ISIS दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार

ISIS विरोधात अमेरिकेची कारवाई सुरूच आहे. सीरियात ISISचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार झालाय. अब्दुल सहमान अल कादुलीला ठार करण्यात अमेरिकेला यश आलंय. 

PTI | Updated: Mar 26, 2016, 10:11 AM IST
अमेरिका कारवाईत ISIS दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार title=
अमेरिकेचे संरक्षण मंत्री कार्टर माहिती देताना

सीरिया : ISIS विरोधात अमेरिकेची कारवाई सुरूच आहे. सीरियात ISISचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार झालाय. अब्दुल सहमान अल कादुलीला ठार करण्यात अमेरिकेला यश आलंय. 

कादुलीला गुरूवारी अमेरिकन सैन्याच्या विशेष पथकानं ठार केलं. एनबीसी न्युज या वृत्तवाहीनीनं ही बातमी दिलीय. अमेरिकेचे संरक्षण मंत्री कार्टर यांनी शुक्रवारी या बातमीला दुजोरा दिला. 

कादुलीला पकडण्यासाठी अमेरिकन सैन्याच्या विशेष पथकाला घेऊन एक हेलीकॉप्टर अज्ञात स्थळी उतरलं होतं. त्यावेळी सैन्य आणि कादुलीच्या अंगरंक्षकांच्या चकमकीत अखेर कादुलीला ठार करण्यात अमेरिकन सैन्याला यश आलं.