www.24taas.com
प्रेषित मोहम्मीद पैगंबर यांच्यावर आधारित ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकन फिल्मचा वाद अजून काही क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांत या फिल्मचा निषेध नोंदवला गेला. यावेळी या आंदोलनांना हिंसेचं वळण लागलंय.
येमेन : अमेरिकन दुतावासात घुसून गाड्या जाळल्या
येमेनमधल्या सना या शहरात फिल्मचा निषेध नोंदवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी अनेक गाड्या जाळून आपला रोष व्यक्त केलाय. आंदोलकांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी अमेरिकन दुतावसाच्या बाहेर एकच गर्दी केली होती. जबरदस्तीनं याठिकाणी घुसून आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केलीय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबारही केला, पण त्यांचे प्रयत्न मात्र अशस्वी झाले.
इजिप्त : फिल्मचा निषेध
इजिप्तमध्येही लोकांनी पैगंबरांचा अपमान करणाऱ्या अमेरिकन फिल्मचा जोरदार निषेध केला. इजिप्तची राजधानी काहिरा इथल्या अमेरिकन दुतावसाबहेर मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. आदोलकांची संख्या मोठी असल्यामुळे तात्काळ पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आलीय. जवळजवळ २०० आंदोलकांनी अमेरिकन दुतावासाच्या बाहेर ‘मिस्र छोडो’चा नारा दिला. काही आंदोलकांनी दुतावास परिसरातील भिंतीवर चढून अमेरिकेचा झेंडा खाली उतरवला आणि त्याजागी काळ्या रंगाचा इस्लामी झेंडा फडकावला. नागरिकांचा राग पाहून सरकारनंही लोकांना शांततेचं आवाहन केलंय.
लिबिया : अमेरिकन दुतावासाची सुरक्षा वाढवली
कालही लिबीयाच्या बेनगाजी आणि इजिप्तनच्याआ कैरो शहरात अमेरिकेच्या दूतावासावर हल्लाच करण्याडत आला होता. त्यात अमेरिकन राजदूत क्रिस्टोफर स्टीवेंस याला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. यानंतर अमेरिकेनं तातडीनं पावलं उचलत लिबियातील दुतावासाची सुरक्षा वाढवलीय.