व्हिडिओ : वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

अमेरिकेतल्या अलबामा इथं वृद्ध भारतीयाला कथित स्वरुपात मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संघीय कायद्यांचं उल्लंघन झालंय किंवा नाही, याची एफबीआय चौकशी करणार आहे. 

Updated: Feb 13, 2015, 12:22 PM IST
व्हिडिओ : वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या अलबामा इथं वृद्ध भारतीयाला कथित स्वरुपात मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संघीय कायद्यांचं उल्लंघन झालंय किंवा नाही, याची एफबीआय चौकशी करणार आहे. 

मेडिसन शहराचे पोलीस प्रमुख लॅरी मुन्से यांनी पीडीत सुरेशभाई पटेल यांची माफी मागत, फेडरला ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनदेखील या प्रकरणाची चौकशी करेल, असं आश्वासन दिलंय. 

गुजरातमध्ये राहणारे सुरेशभाई पटेल (वय ५७ वर्ष) हे दोन आठवड्यांपूर्वी अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेले आहेत. त्यांचा मुलगा चिराग पटेल हा नोकरीनिमित्त अल्बामा इथं असतो. घराबाहेरील रस्त्यावर फेरफटका मारत असताना दोन पोलीस अधिकाऱ्यानं त्यांची चौकशी केली. यावेळी, सुरेशभाई यांना नीटसं इंग्रजी येत नसल्यानं या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला. या मारहाणीमुळे सुरेशभाई यांना पॅरेलिसिसचा अॅटॅकही आलाय. 

मुन्से यांनी मीडियाशी बोलताना 'मी पटेल आणि कुटुंबीयांची आमच्यातर्फे मनापासून माफी मागतोय. अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू' असं म्हटलंय. यावेळी, या घटनेची ऑडिओ-व्हिडिओ क्लीपही जाहीर करण्यात आली. आरोपी अधिकारी पार्कर याची हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही आपण ठेवला असल्याचं त्यांनी म्हटलंय. पार्कर याला थर्ड डिग्रीचा गैरवापर केल्याप्रकरणात अटक करण्यात आलीय. 
 

व्हिडिओ पाहा :-

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.