पाहा व्हिडिओ : विना चालक गाडी रस्त्यावर धावली

विना चालक गाडी धावली तर...असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय. जर पडला असेल तर तो प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अधिक आहे. विना चालक गाडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेय. त्यामुळे आगामी वर्षभरात हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. विना चालक कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2017, 09:06 PM IST
पाहा व्हिडिओ : विना चालक गाडी रस्त्यावर धावली title=
सौजन्य - यु-ट्यूब

बर्लिन : विना चालक गाडी धावली तर...असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय. जर पडला असेल तर तो प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अधिक आहे. विना चालक गाडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेय. त्यामुळे आगामी वर्षभरात हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. विना चालक कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार किंवा एकादे वाहने चालवण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज असते, मात्र तुम्ही कधी ड्रायव्हर विरहित कार रस्त्यावरून धावताना पाहिली आहे का? नाही ना! पण तुम्ही विना चालक कारमध्ये बसून प्रवास करू शकणार आहात.

जर्मनीची इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग पॉवरहाऊस कंपनी बॉश आणि मर्सिडिज बेंझ मिळून संयुक्तपणे विना चालक कारवर काम करत आहेत. कंपनी पुढील काळात एक दर्जेदार, स्वायत्त स्वयंचलित कार आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

मर्सिडिज-बॉश कंपनीपाठोपाठ अनेक कंपन्या स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीमध्ये उतरल्या आहेत. कंपनीनं बनवलेल्या स्वयंचलीत वाहनाची चाचणीही घेण्यात आली आहे. गूगलचीही काय बाजारात येत आहे. त्यामुळे अशा कारमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.