बिकिनीत विचित्र सेल्फी घेणाऱ्या महिलेचा व्हिडिओ वायरल

बिकिनीमध्ये वेगवेगळ्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झालाय. एका मिनिटाहून अधिक वेळेचा असलेल्या या व्हिडिओमध्ये महिला खूप विचित्रपद्धतीनं सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतेय. आतापर्यंत यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. 

Updated: Oct 13, 2014, 07:56 PM IST
बिकिनीत विचित्र सेल्फी घेणाऱ्या महिलेचा व्हिडिओ वायरल title=

न्यू यॉर्क: बिकिनीमध्ये वेगवेगळ्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झालाय. एका मिनिटाहून अधिक वेळेचा असलेल्या या व्हिडिओमध्ये महिला खूप विचित्रपद्धतीनं सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतेय. आतापर्यंत यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. 

व्हिडिओ कुठल्या ठिकाणाचा आहे हे अजून कळलं नाहीय. यात महिला वेगवेगळ्या अँगलने आपली सेल्फी काढतांना दिसते. महिलेचा हा व्हिडिओ लपवून काढला गेलाय. 

व्हिडिओ शूट करणारी महिला व्हिडिओ काढतांना म्हणतेय, ‘खरंच, ही मुलगी खूप वेळापासून असं करतेय. मी आपला फोन उचलला आणि सहजच तिचे फोटो काढले आणि आता तिच्या या विचित्र हालचालींचा व्हिडिओ.’ 

सेल्फी घेणारी ही महिला जेव्हा ’लो अँगल शॉट’ घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्हिडिओ काढणारी महिला म्हणते, ‘ओह माय गॉड. काय गंमत आहे. ती खालून फोटो काढण्याचा प्रयत्न करतेय.’ व्हिडिओ क्लिपवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकं व्हिडिओ काढणाऱ्या महिलेला कोणाच्या तरी खाजगी आयुष्यात डोकावल्यानं सुनावतायेत. 

(with IANS inputs)

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.