'व्हॉटस अॅप'वर प्रतिसाद न दिल्याने पत्नीला 'घटस्फोट'

 घटस्फोटासाठी व्हॉटस अॅप हे पहिल्यांदा कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉट्‌सऍपवर पत्नीने प्रतिसाद न दिल्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आली. पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी वॉट्‌सअॅप हे कारणीभूत ठरले आहे. 

Updated: Nov 17, 2014, 08:35 PM IST
'व्हॉटस अॅप'वर प्रतिसाद न दिल्याने पत्नीला 'घटस्फोट' title=

दुबई :  घटस्फोटासाठी व्हॉटस अॅप हे पहिल्यांदा कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉट्‌सऍपवर पत्नीने प्रतिसाद न दिल्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आली. पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी वॉट्‌सअॅप हे कारणीभूत ठरले आहे. 

घटस्फोटाचे कारण देताना पतीने म्हटले आहे की, ‘पत्नी वॉट्‌सऍपवर सतत तिच्या मित्रांबरोबर चॅटिंग करत असे. मात्र, मला प्रतिसाद देत नव्हती. वॉट्‌सऍपच्या एवढी आहारी गेली होती की, घरकाम आणि मुलांच्या संगोपनाकडे तिचे लक्ष नव्हते. दिवसातील जास्तीत-जास्त वेळ मित्रांबरोबर बोलण्यात जात असे. अनेकदा तिला समजावण्यातही आले होते. मात्र, वॉट्‌सऍपमधून ती बाहेर येत नव्हती. 
www.24taas.com

वॉट्‌सऍपवर तिला अनेकदा मजकूर पाठवून समजावले होते. परंतु, माझे मजकूर वाचून ती सोडत असे. एकाही मजकूराला प्रतिसाद देत नव्हती. शेवटी कंटाळून तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पतीने म्हटले आहे. 

दरम्यान, सन २०११ पासून झालेल्या घटस्फोटांपैकी एक तृतीअंश घटस्फोट हे सोशल नेटवर्किंगमुळे घडले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.