व्हिडिओ: स्कर्टच्या आत टीव्ही घेऊन पळाली महिला

कोस्टारिकाच्या एका स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक धक्कादायक दृश्य कैद झालंय. हा व्हिडिओ पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही की, कोणी अशीही चोरी करू शकतो. 

Updated: Jan 19, 2015, 01:33 PM IST
व्हिडिओ: स्कर्टच्या आत टीव्ही घेऊन पळाली महिला title=

नवी दिल्ली: कोस्टारिकाच्या एका स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक धक्कादायक दृश्य कैद झालंय. हा व्हिडिओ पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही की, कोणी अशीही चोरी करू शकतो. 

या व्हिडिओमध्ये एक महिला स्टोअरमध्ये येते आणि समोर ठेवलेला एलसीडी टिव्ही आपल्या स्कर्टमध्ये पायांच्या आधारे दाबून घेते आणि बाहेर निघते. प्रत्येक जण या महिलेनं केलेल्या चोरीची पद्धत पाहून आश्चर्यचकित झालंय.

चोरीची ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडलीय. मात्र आतापर्यंत तिला अटक झाली नाहीय आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला गेलाय. जेणेकरून या महिलेला पकडता येईल.

इथल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, महिलेची ही चोरी पाहून असं वाटतंय की, यापूर्वीही तिनं अशाचप्रकारे चोरी केलेली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.