नवी दिल्ली: अमेरिकन स्पेस एजंसी नासाच्या क्यूरियोसिटीनं मंगळावर घेतलेले फोटो पाठवलेत. हे फोटो पाहून आपली उत्सुकता अधिक वाढेल. कारण क्यूरियोसिटीनं मंगळ ग्रहावरील पाढवलेल्या एका फोटोमध्ये एका महिलेची आकृती दिसतेय.
एक महिला खूप दूर पहाडांमध्ये उभी आहे, असं चित्र या फोटोंमधून दिसतंय. पण हा फोटो खूप छोटा आहे. त्यामुळं अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे.
पण सोशल मीडियावर या फोटोनं खूप उत्सुकता निर्माण केलीय. लोकांचं म्हणणं आहे की, मंगळावर अशा प्रकारच्या या घटना हे सिद्ध करतायेत की, मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.
नासाचं मार्स रोव्हर क्यूरियोसिटी मंगळावरील अनेक फोटो सातत्यानं पाठवत आहे. येणारा प्रत्येक फोटो सर्वांची उत्सुकता वाढवणारा आहे.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.