अद्भूत, एकत्र फुटले तीन ज्वालामुखी, पाहा फोटो

 नासाने ज्वालामुखीने लावा फुटण्यासंबंधी एक अद्भूत फोटो प्रसिद्ध केला आहे. नासाचे अनेक सॅटेलाइट आहे जे नियमित कालावधीने फोटो काढत असतात. 

Updated: Oct 7, 2016, 04:59 PM IST
अद्भूत, एकत्र फुटले तीन ज्वालामुखी, पाहा फोटो  title=

नवी दिल्ली :  नासाने ज्वालामुखीने लावा फुटण्यासंबंधी एक अद्भूत फोटो प्रसिद्ध केला आहे. नासाचे अनेक सॅटेलाइट आहे जे नियमित कालावधीने फोटो काढत असतात. 

नासाचे सॅटेलाईट एक्का हा एक मल्टी नॅशनल सायंटिफीक रिसर्च सॅटेलाइट आहे. तो नासाला अनेक अद्भूत फोटो पाठवतात. हा सॅटेलाइट पाऊस, बाष्पीकरण, वॉटर सायकल सारखे अद्भूत फोटो नासाला पाठवतो. याचा उपयोग रिसर्चसाठी केला जातो. 

नासाने नुकताच एक फोट प्रसिद्ध केला आहे यात तीन ज्वालामुखी एकाच वेळी फुटताना दिसत आहे. या फोटोत लाव्यासह एक मोठा धूर दिसत आहे. हा फोटो साऊथ सँडविच द्विपावर हे ज्वालामुखी स्फोट झाले आहेत. हे बेट दक्षिण अटलांटिक महासागरात आहे.