'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

Updated: Dec 26, 2015, 03:16 PM IST
'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन title=

मेक्सिको : जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

मोरेनो हा केवळ ३८ वर्षांचा होता. एकेकाळी त्याचं वजन ४५० किलोपर्यंत पोहचलं  होतं. आपलं वजन कमी करण्यासाठी त्यानं जालिस्को राज्याच्या गुआडालाजारामध्ये २८ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया केली होती. 

आपलं वजन कमी करून आपण एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकू असा आशावाद मोरेनोला होता. परंतु, त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली.

शस्रक्रियेनंतर मोरेनोच्या पोटाचा जवळपास तीन तृतीयांश भाग कमी करण्यात आला होता... आणि त्याला एक नवीन आकार देण्यात आला. अधिक जेवण खाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या पोटात एक ट्युबही लावण्यात आला होता. 

परंतु, ख्रिसमसच्या दिवशी मोरेनोला श्वास घेण्यात अडथळा जाणवत होता. त्याला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्याअगोदरच अॅम्ब्युलन्समध्ये त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का आणि पोटातील आतड्यांमध्ये सूज असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.