नवी दिल्ली : झी मीडियाच्या हाती भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक ऑडिओ टेप लागला आहे. दाऊदने या ऑडिओ टेपमध्ये इकबाल नावाच्या एका व्यक्तीशी दुबईतील एका प्रोजेक्टसंबंधी पैशांच्या देवाणघेवाणी संदर्भात बोलणे झाले आहे.
या बोलण्यावरून स्पष्ट होते की दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये आहे. इकबाल दाऊदला ३ लाख दिरहम यासीर नावाच्या एका व्यक्तीला देण्यास सांगतो आहे. त्यानंतर दाऊद म्हणतो की यासीर तर येथे कराचीमध्ये आहे. म्हणजे दाऊद कराचीमध्ये वास्तव्याला आहे.
इकबाल नावाच्या या व्यक्तीचे दाऊदशी बोलणे भारताच्या गुप्तचर संघटनेने रेकॉर्ड केले आहे. दाऊदच्या आवाजाची माहिती असलेले पत्रकार बलजीत परमारने या ऑडिओतील आवाज दाऊदचाच असल्याला दुजोरा दिला आहे. परमार यांनी सांगितले की, पाकिस्तान भारताला धोका देत आहे.
दाऊदच्या या कबुलीजबाबाने पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा समोर आला आहे. पाकिस्तानने अनेकवेळा सांगितले की दाऊद त्यांच्या देशात नाही. पण ऑडिओ टेपने हे खोटं उघड पाडले आहे. या फोनवरील संभाषणात दाऊदने आपला पत्ता आणि साथीदारांबद्दलही बोलले आहे.
दाऊद इब्राहिम आणि इकबालमध्ये झालेल्या संभाषणाचे काही अंश
इकबाल- तो अभी वहां 3 एक लाख दिरहम चाहिए होंगे।
दाऊद- हां-हां।
इकबाल- तो अभी फिलहाल सब काम चलेंगे।
दाऊद- ठीक है, मैं भिजवा देता हूं, बोल देता हूं, किसको देना है?
इकबाल- यासिर को, यासिर को भिजवाते हैं तो मैं कर लूंगा।
दाऊद- बोल देता हूं मैं, यासिर तो यहीं है कराची में, मैं यासिर को बोल देता हूं।
या चर्चेत आणखी एक व्यक्ती अमृत सिंह याचेही नाव समोर आले आहे. त्याच्या खात्यात दाऊदला पैसे टाकण्यास लावले जात आहे. हा अमृत सिंह कोण आहे? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर गुप्तचर संघटना शोधत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.