www.24taas.com, लाहोर
पाकिस्तानचे हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे आणि माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा परतीचा प्रवास अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुशर्रफ यांचा पाक परतीचा मार्ग अवघड आहे. त्यांच्या परतीची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी सूचित केले. पाकिस्तानला परतण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केला; परंतु काल त्यांनी माघार घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी आपला निर्णय पुढे ढकलत असल्याचे ते म्हणाले. समर्थकांचा सल्ला घेऊनच पुढील पाऊल उचलण्यात येईल, असेही मुशर्रफ यांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या तपासात कथितरीत्या सहकार्य न केल्याबद्दल मुशर्रफ यांच्यावर ठपका आहे. त्यांच्यावर अटक वॉरंट बजाविण्यात आले आहे. तसेच ऑगस्ट २००६ मध्ये सैन्याच्या कारवाईत बलुच नेते अकबर बग्ती यांची हत्या झाल्याप्रकरणीही मुशर्रफ आरोपी आहेत.
आणखी संबंधित बातम्या
‘मुशर्रफना ठार करा, १० कोटी जिंका’
परवेझ मुशर्रफ यांचा कानावर हात