सलमान खानचा बजरंगी भाईजान पार करणार ५०० कोटींचा टप्पा

 सलमान खान हा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसचा जादूगर असल्याचं पुन्हा त्याने सिद्ध केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण इतर खानांपेक्षा अधिक यशस्वी असल्याचे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं आहे. आता त्याने बजरंगी भाईजानच्या माध्यमातून आपलं त्याने ही किमया करून दाखवली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 31, 2015, 08:12 PM IST
सलमान खानचा बजरंगी भाईजान पार करणार ५०० कोटींचा टप्पा title=
बजरंगी भाईजानचे पोस्टर

मुंबई  :  सलमान खान हा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसचा जादूगर असल्याचं पुन्हा त्याने सिद्ध केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण इतर खानांपेक्षा अधिक यशस्वी असल्याचे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं आहे. आता त्याने बजरंगी भाईजानच्या माध्यमातून आपलं त्याने ही किमया करून दाखवली आहे. 

कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान’भारतीय बाजारात ३५० कोटींची कमाई केली आहे, तर जगभऱात सुमारे १२८ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच तो ५०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. 

Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण

गेल्या आठवड्यात बजरंगीने बाहुबलीला धोबीपछाड देत मागे टाकले होते. त्यावेळी सलमानचा हा चित्रपट ४०० कोटी क्लमध्ये गेला होता. बाहुबली त्यावेळी ३८५ कोटीची कमाई केली होती. 

या चित्रपटात बजरंग बलीचा भक्त पवनकुमार चतुर्वेदी (सलमान) एका मुक्या पाकिस्तानी मुलीला तिच्या गावात सुरक्षित पोहचवतो अशी या चित्रपटाची काहणी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.