उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीरबद्दल न माहिती असलेल्या ९ गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे.

Updated: Mar 4, 2016, 05:32 PM IST
उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीरबद्दल न माहिती असलेल्या ९ गोष्टी title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. उर्मिलाने गुरूवारी आपल्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्याशी लग्न केले आहे. 

लग्न खूप साधेपणाने झाले. लग्नाबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. यात दोन्ही कुटुंबातील काही ठराविक जण आणि काही मित्र उपस्थित होते. 

१) उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीर हा काश्मीरातील आहे. 

 

२) त्याचा गारमेंट्सचा बिझनेस आहे. 

 

३) त्याने मॉडेलिंगही केली आहे. 

 

४) मीरने फरहान अख्तरची बहीण जोया अख्तरचा चित्रपट 'लक बाय चान्स' मध्ये एक भूमिका निभावली होती. 

 

५) ३३ वर्षांच्या मोहसिन २००७ मध्ये मिस्टर इंडिया कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनर अप होता. 

 

६) त्याचा एक चित्रपट 'अ मेन्स वर्ल्ड' अजून रिलिज होणे बाकी आहे. 

 

७) मोहसिनने सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शो पासून मॉडेलिंग सुरू केली आहे. 

 

८) मोहसिन उर्मिलापेक्षा तब्बल ९ वर्षांनी लहान आहे. 

 

९) मीर हा ए.आर. रहमान याच्या म्युझिक व्हिडिओ 'ताजमहाल'मध्ये काम केले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x