फोटो : 'बेबो' असा साजरा करतेय आपला वाढदिवस!

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर - खान ही आज ३५ वर्षांची झालीय. हा दिवस बेबोच्या लक्षात राहावा यासाठी तिचा पती सैफ अली खाननं कंबर कसलीय.

Updated: Sep 21, 2015, 04:51 PM IST
फोटो : 'बेबो' असा साजरा करतेय आपला वाढदिवस! title=

मुंबई : बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर - खान ही आज ३५ वर्षांची झालीय. हा दिवस बेबोच्या लक्षात राहावा यासाठी तिचा पती सैफ अली खाननं कंबर कसलीय.

बेबोला आपला वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा करायचा होता... आणि करीनाचा इच्छा सैफच्या शिरोधारीच असते... मग काय, सैफनं तातडीनं करिनाची ही इच्छा उचलून धरली आणि वाढदिवसाची जय्यत तयारीही केली. 

सैफनं आपल्या मित्र-मैत्रिणींना पतौडी पॅलेसवर बोलावून घेतलंय... आणि इथंच त्यांच्यासोबत बेबो आपला वाढदिवस साजरा करतेय. 


'बेबो'चा वाढदिवस

बेबोला शुभेच्छा देण्यासाठी तिची मोठी बहिण करीना कपूर, जवळची मैत्रिण अमृता अरोरा, मलाईका अरोरा - खान पतौडी पॅलेसमध्ये दाखल झाल्यात. आपल्या नवऱ्यासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत एक टॉप आणि शॉर्ट पॅन्ट घालून करीनानं धम्माल फोटो काढलेत. बर्थडे सेलिब्रेशनच्या अगोदर त्यांनी सेल्पी काढत धम्माल-मस्ती केली. 

आपल्या या बिलंदर मित्र-मैत्रिणींसोबत करीनानं एक डार्क चॉकलेट केकही कापलाय. सैफनं आपल्या बायकोची आवड लक्षात घेऊन हा केक ऑर्डर केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.