अभिनेता राजेश विवेक यांचे निधन

अभिनेता राजेश विवेक यांचे निधन हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

Updated: Jan 14, 2016, 11:09 PM IST
अभिनेता राजेश विवेक यांचे निधन title=

 हैदराबाद : लगान चित्रपटातील गुरन व्यक्ती रेखेतून चित्रपट रसिकांच्या मनात घर केल्या अभिनेता राजेश विवेक यांचे निधन हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 
ते ६६ वर्षांचे होते. 

राजेश विवेक हे नाट्य अभिनेते म्हणून सर्वांना ओळखीचे होते. त्यांनी हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्याचे काम केले. त्यांचा लगानमधील गुरन यांची भूमिक सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. 

तसेच त्यांनी शाहरूख खान याच्या 'स्वदेस'मध्ये पोस्टमनची भूमिका केली होती.  दूरदर्शनवरील महाभारत या मालिकेत वेद व्यासांची भूमिका केली होती. 

त्यांनी खलनायक म्हणून विराना आणि जोशिला चित्रपटात दिसले होते. 

त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९४९ मध्ये उत्तरप्रदेशात झाला होता. त्यांनी जौनपूर उत्तरप्रदेश येथून एम.ए. पर्यंतचे शिक्षण केले. श्याम बेनेगल यांनी जूनून या चित्रपटातून त्यांना ब्रेक दिला होता. 

राजेश विवेक यांचे चित्रपट 

वर्ष    चित्रपट 
2008    जोधा अकबर
2006    भूत अंकल
2005    वादा
2005    बंटी और बबली
2004    अब तुम्हारे हवाले वतन साथियों
2004    हत्या
2004    स्वदेश
2004    असंभव
2003    दिल का रिश्ता
2001    लगान
1998    परदेसी बाबू
1997    लोहा
1992    नागिन और लुटेरे
1992    पारसमणी
1991    गंगा जमुना की ललकार
1991    विषकन्या
1989    जोशीले
1989    त्रिदेव
1988    वीराना

 

पाहा लगान मधील गाणे...