कोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात

अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Updated: Feb 9, 2017, 10:46 AM IST
कोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात  title=

मुंबई : अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

श्रुतिनं आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात ती एका कोब्रा नागासोबत खेळत असताना दिसत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी कारवाई करत श्रुती आणि तिच्यासोबत दोन प्रोडक्शन मॅनेजरना अटक केलीय. 

या तिघांविरोधात वाईल्डलाईफ अॅक्टनुसार कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आलाय.