मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय.
'सिनेमा ओनर्स एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (COEAI) सदस्यांनी आपल्या थिएटर्समध्ये 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाला स्क्रिन उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतलाय.
गुजरात, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधले सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सचे अनेक मालक या असोसिएशनचे सदस्य आहेत.
ज्या सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत असतील अशा सिनेमांना COEAI स्क्रीन उपलब्ध करून देणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन नाही तर जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी म्हटलंय.
अर्थातच, सिने असोसिएशनच्या या निर्णयाचा फटका खुद्द थिएटर मालकांनाही बसणार आहे.