रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.

Updated: Oct 24, 2016, 11:16 AM IST
रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.

रणबीरसोबतच्या सीन्सबाबत बोलताना ऐश्वर्या म्हणाली, माझे रणबीरसोबतचे सीन्स वाईट अथवा सेक्सी नाहीयेत. तर ते चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलेत. 

मला माहीत आहे या सिनेमाची जर्नी कशी असेल. चिंता करण्याची मला गरज वाटत नाही. मला माझ्या भूमिकेबाबत सर्व माहिती आहे, असे ऐश्वर्या म्हणाली.

येत्या 28 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात रणबीर आणि ऐश्वर्यासह अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्याही भूमिका आहेत.