पहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत

आपल्या टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडवर लिलया खेळ खेळणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. 

Updated: Oct 21, 2016, 03:55 PM IST
पहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत  title=

मुंबई : आपल्या टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडवर लिलया खेळ खेळणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. 

अक्षय कुमारला ज्या सिनेनिर्मात्यानं पहिला सिनेमा मिळवून देण्यास मदत केली होती... त्यांच्या उपकारांची परतफेड अक्षयला करायचीय. 

मिळालेल्या माहितीनुसार निर्माते रवी श्रीवास्तव सध्या किडनीच्या गंभीर आजाराशी झगडत आहेत. त्यांना ट्रान्सप्लान्टसाठी पैशांची गरज आहे. सध्या ते बेडवरच असतात.

ट्विटरवर एका प्रश्नाला उत्तर देताना ४९ वर्षीय अभिनेता अक्षय कुमारनं 'आपली टीम त्यांच्या सतत संपर्कात आहे...' असं म्हटलंय. किडनी ट्रान्सप्लान्टसाठी अक्षय श्रीवास्तव यांना मदत करणार आहे.  

निर्माते रवी श्रीवास्तव यांनी १९९१ मध्ये आलेल्या 'द्वारपाल' हा सिनेमावर काम सुरू केलं होतं. अक्षयनं साईन केलेला हा पहिला सिनेमा होता. परंतु, हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर अक्षयचा 'सौगंध' हा प्रदर्शित झालेला पहिलाच सिनेमा ठरला.... हा सिनेमाही श्रीवास्तव यांनीच अक्षयला मिळवून दिला होता.