उन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी

अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Updated: Jun 1, 2015, 05:12 PM IST
उन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी title=

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय आलियानं सांगितलं होतं, उन्हापासून बचावासाठी आपण खूप पाणी प्यायला हवं. सोबतच मध्ये-मध्ये पेय पदार्थ पण प्यायला हवेत.

आलिया आता गार्नियर फ्रुक्टस ऑईल-इन-क्रीमच्या जाहिरातीत आपली आई सोनी राजदान सोबत दिसणार आहे. तसंच आलियाचा आगामी चित्रपट 'शानदार' आहे, ४ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.