आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी

अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव.

Updated: Mar 31, 2016, 08:03 PM IST
आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी title=

मुंबई: अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव. या वादावर अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहून भाष्य केलं आहे. 

मी या प्रकरणामध्ये निर्दोष होतो, पण या त्रासातून बाहेर यायला मला 25 वर्ष लागल्याचं बिग बी म्हणाले आहेत. जेव्हा बोफोर्स घोटाळ्यामध्ये माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आरोप झाले. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता.

आरोप करणं सोपं आहे, असे वाद पटापट पसरवले जातात, 2012मध्ये मला या प्रकरणामध्ये क्लिन चिट मिळाली पण बराच काळ खोटं आणि धोक्याच्या दबावाखाली रहावं लागलं असं अमिताभ आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत. 

क्लिन चिट मिळाल्यानंतर अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली. पण मी काय प्रतिक्रिया द्यायची, 25 वर्ष झालेला त्रास ते मिटवू शकतात का, माझी झालेली बदनामी ते मिटवू शकतात का, असा सवालही अमिताभ यांनी विचारला आहे.