बाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!

एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. 

Updated: Mar 16, 2017, 05:38 PM IST
बाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर! title=

मुंबई : एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. 

आमिर खानचा सिनेमा म्हटल्यानंतर ही चर्चा होणं साहजिकच आहे... त्यानंतर आता या सिनेमात बीग बी अमिताभ बच्चनदेखील दिसणार आणि तेही आमिरच्या पित्याच्या भूमिकेत... मग, चर्चा तर होणारच ना... 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये अमिताभ-आमिरला बाप-मुलाच्या भूमिकेत पाहणं, हादेखील प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. 

या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचा शोध मात्र अद्याप संपलेला नाही. फातिमा शेख, आलिया भट्ट, वाणी कपूर, श्रद्धा कपूर अशी अनेक नावं या स्पर्धेत आहेत. 

या चित्रपटाची कहाणी लिहिलीय फिलिप मेडॉय टेलर यांनी तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत विजय कृष्ण आचार्य... 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा 2018 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय. मे महिन्यापासून याच्या शुटिंगला सुरूवात होईल.