मुंबई : बॉलिवूडचा बिग बी महानायक अमिताभ बच्चन आज आपला 72वा वाढदिवस साजरा करीत आहे. बिग बी मूळ गावी म्हणजे अलाहाबादमध्येही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.
अलाहाबादमधील कटघर परिसरात अमिताभ बच्चन याचं बालपण गेलं. तेथील वातावरण आज एखाद्या मंदिरासारखं आहे. महानायकाच्या चाहत्यांनी त्यांच्या घरात गर्दी करत केक कापले. काही उत्साही कार्यकर्त्यांनी प्रार्थना आणि शंखनाद करून अमिताभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अमिताभ बच्चन यांचे बालपण गेलेल्या घरापासूनच जवळ असलेल्या तक्षक तीर्थ शिवालयात यज्ञ आणि होमहवन करण्यात आला.
T 1640 - And as we turn the night to morning wives turn on the morning light to fast and pray for their husbands .. its Karva Chauth now !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 10, 2014
काही चाहत्यांनी महानायकाला भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव यावे, अशी मागणी केली. दरम्यान, लाखो चाहत्यांशी एकाच मंचावर जोडण्याचा निर्णय बिग बीने घेतला आहे. फ्लूयेन्स हे डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडण्यास मदत करणार आहे.
दरवर्षी चाहत्यांना माझ्या प्रति असलेले प्रेम मी जाणतो, असे अमिताभने म्हटले आहे. त्यामुळं ट्विटर आणि फ्लूयेन्सच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक चाहत्याला स्वतः आभार व्यक्त करायचे आहे. प्रत्येक वर्गात बच्चन यांचा चाहता आपल्याला दिसून येतात. फेसबूक, ट्विटर आणि टम्बलर यासारख्या सोशल मीडियाच्या मंचावर त्यांना अनेक जण फॉलो करतात. त्याना फॉलो करणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.