विराटच्या 'लव्ह' ट्वीटला अनुष्काचं 'थँक्यू'

अभिनेत्री अनुष्का शर्माचा एकानंतर एक सिनेमा सध्या हीट होतोय. अनुष्काचा एनएच १० मधील परफॉर्म पाहून अनुष्का आणि फिल्मच्या टीमची सर्वांनी वाह वा केली.

Updated: Mar 18, 2015, 06:03 PM IST
विराटच्या 'लव्ह' ट्वीटला अनुष्काचं 'थँक्यू' title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माचा एकानंतर एक सिनेमा सध्या हीट होतोय. अनुष्काचा एनएच १० मधील परफॉर्म पाहून अनुष्का आणि फिल्मच्या टीमची सर्वांनी वाह वा केली.

मात्र यात अनु्ष्कासाठी खास असलेला टीम इंडियाचा युवा बॅटसमन आणि तिचा मित्र विराट कोहलीचाही समावेश आहे, विराटने अनुष्काची ट्वीटरवर वाहवा केली आहे. एवढंच नाही तर त्याने जाहीरपणे म्हटलंय की, अनुष्का माझं प्रेम आहे.

अनुष्का नेहमीच विराट आणि तिच्या संबंधांबद्दल बोलायला नाखुश असते, पण विराटच्या ट्वीटला तिने आनंदाने ट्वीट करून उत्तर दिलं आहे. 

अनुष्काने विराटला 'थँक यू' म्हटलंय. अनुष्का आणि विराटचे फॅन्स भलतेच खूश झाले आहेत. अनुष्काने या प्रेमसंबंधांची जाहीर कबुली अजूनही कधी दिलेली नाही, तिने या प्रश्नावर नेहमीच मौन पाळले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.