अनुष्काला भेटली नवीन मैत्रीण... दीपिका!

आयपीएलमधील कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माही उपस्थित होती. मात्र,

Updated: May 21, 2015, 05:51 PM IST

मुंबई : आयपीएलमधील कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माही उपस्थित होती. मात्र, यावेळी चर्चा अनुष्काची नाही तर तिच्या नवीन मैत्रिणीची झाली, जी स्टॅन्डमध्ये तिच्यासोबत उपस्थित होती. 

राजस्थान विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का मैदानात उपस्थित होती. अनुष्कासोबत बंगळुरूचा दिनेश कार्तिकची पत्नी आणि क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकलही मैदानात उपस्थित होती. अनुष्का आणि दीपिका दोघांनी मिळून या सामन्याचा आनंद लुटला. 

बंगळुरूनं राजस्थानला पराभूत करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एन्ट्री मिळवलीय. त्यामुळे बंगळुरूचा सामना आता चेन्नईविरुद्ध रांचीत होणार आहे. या सामन्यातील विजयी टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध भिडणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.