मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
अपार्टमेंटच्या कॉमन पॅसेजमध्ये अनधिकृत इलेक्ट्रिक मीटर बसवल्यानं तिला ही नोटीस बजावण्यात आलीय. के वेस्ट वॉर्ड ऑफिसनं ही नोटीस बजावलीय.
अंधेरीतल्या वर्सोवामध्ये बद्रीनाथ टॉवरमध्ये ती राहते. तिथल्या विसाव्या मजल्यावर तिच्या फ्लॅट आहे. त्या फ्लॅटबाहेरच्या कॉमन पॅसेजमध्ये तिने इलेक्ट्रिक मीटर बसवलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी तिच्याविरुद्ध तक्रार केली होतीय. या तक्रारीवरुन बीएमसीने तिला ही नोटीस पाठवलीये.