अनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या 'त्या' केवळ अफवा?

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरच्या चर्चां काही दिवसांपूर्वी अचानक 'विवाहा'च्या मार्गावर वळल्या... पण, आता मात्र अनुष्कानंच या बातम्यांना लगाम घातलाय.

Updated: Oct 28, 2015, 04:23 PM IST
अनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या 'त्या' केवळ अफवा? title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरच्या चर्चां काही दिवसांपूर्वी अचानक 'विवाहा'च्या मार्गावर वळल्या... पण, आता मात्र अनुष्कानंच या बातम्यांना लगाम घातलाय.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अनुष्कानं विराटसोबत आपल्या संबंधांचा खुलासा केला होता. त्यानंतर अनेकदा विराट-अनुष्काच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला.

अधिक वाचा - विराट - अनुष्कात दुरावा, सर्व काही ठिक नाही!

पण, अनुष्काच्या वडिलांसोबत अनुष्का आणि विराट फिरताना दिसले आणि या बातम्यांनी आणखीनच जोर घेतला. तसंच अनुष्का आणि विराट एका घराच्याही शोधात असल्याचं समजलं... आणि हे स्टार जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सुरू झाल्या.  

यानंतर अनुष्कानं आपलं म्हणणंच मांडण्यासाठी एक पत्रकच जाहीर केलंय. 'अनुष्काच्या विवाहाबद्दल ज्या काही अफवा उडतायत त्यांमध्ये जराही सत्यता नाही. ती सध्या आपल्या कामामध्ये खूप व्यस्त आहे' असं यामध्ये म्हटलं गेलंय. 

अधिक वाचा - अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की...

तसंच 'अनुष्कानं आपल्या आयुष्याबद्दल नेहमीच उघडपणे आपलं म्हणणं मांडलंय... आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिनं नेहमीच लोकांनी वावड्या न उठवता आपल्याकडून केल्या जाणाऱ्या घोषणेची वाट पाहावी अशी विनंती केलीय' असंही यात म्हटलं गेलंय.

अनुष्काच्या बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल आणि दिल धडकने दो या सिनेमांतील सहकलाकार रणवीर सिंह यांच्यासोबतच्या डेटसबद्दलही बरीच चर्चा झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.