रणबीरने अनुष्काकडून कानाखाली खाल्ली

रणबीर कपूरला आपल्या आगामी ऐ दिल है मुश्किल सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. या सिनेमाला हिट करण्यासाठी रणबीरने अनुष्काकडून कानाखाली पण खाल्लीये.

Updated: Oct 19, 2016, 10:24 AM IST
रणबीरने अनुष्काकडून कानाखाली खाल्ली

मुंबई : रणबीर कपूरला आपल्या आगामी ऐ दिल है मुश्किल सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. या सिनेमाला हिट करण्यासाठी रणबीरने अनुष्काकडून कानाखाली पण खाल्लीये.

ऐ दिल है मुश्किल सिनेमातील ट्रेलर आणि गाण्यांमध्ये रणबीर आणि ऐश्वर्याच्या सिझलिंग केमिस्ट्रीची तर सगळीकडे चर्चा होतेय.

मात्र, रणबीर आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीकडेही कानाडोळा करुन चालणार नाही. या सिनेमाचा एक नवा  व्हिडिओ रिलीज झालाये..या व्हिडिओमध्ये या दोन्ही कलाकारांमधील जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळतेय.

या सिनेमात रणबीर आणि अनुष्का एकमेकांचे चांगले मित्र दाखविले आहेत..रियललाईफमध्येही हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.