चित्रातून साकारली रात्रीस खेळ चाले मालिकेतील पात्रे

झी मराठीवरची रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका बंद होत आहे. मालवणी बोलीभाषेतली ही मालिका आणि त्यातली पात्रं, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. 

Updated: Oct 10, 2016, 09:49 AM IST
चित्रातून साकारली रात्रीस खेळ चाले मालिकेतील पात्रे

मुंबई : झी मराठीवरची रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका बंद होत आहे. मालवणी बोलीभाषेतली ही मालिका आणि त्यातली पात्रं, प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. 

आपल्या या आवडत्या मालिकेला निरोप देताना, मुंबईतल्या गुरूकुल ऍकॅडमीतल्या चिमकुल्यांनी, ही मालिका आणि त्यातल्या पात्रांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच त्यांची चित्रंही साकारली. 

मालिका सुरु झाल्यापासून त्यातील रहस्यमय घडामोडींमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यामुऴे नवीन कलाकार असूनही प्रेक्षकांनी या कलाकारांवर भरभरुन प्रेम केले.