'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?

आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 

Updated: Aug 3, 2015, 01:57 PM IST
'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?

मुंबई: आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 

कुटुंबियांच्या पसंतीनं काही महिन्यांपूर्वीच प्रभाषचं लग्न ठरलंय. बाहुबलीच्या शूटिंगमुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. आता मात्र डिसेंबरमध्ये लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. प्रभाषच्या घरी लग्नाची तयारीही सुरू झालीय. 

प्रभाषची नववधू 

आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की, प्रभाषची नववधू कोणी तरी प्रसिद्ध अभिनेत्री किंवा कोणत्या निर्मात्याची मुलगी तर नसेल. पण प्रभाषची होणारी पत्नी ही सामान्य घरातील आहे.  प्रभाषची नववधू इंजीनिअरिंगची विद्यार्थिनी आहे आणि सध्या साऊथच्या कोणत्या तरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतेय.

प्रभाषच्या लग्नाची कथा ही शाहिद कपूरच्या लग्नासारखीच वाटते. कारण प्रभाष सामान्य मुलीसोबत लग्न करतोय. हे एक अरेंज मॅरेज आहे. तसंच शाहिद सारखीच प्रभाषच्या नववधूही त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. प्रभाषचं वय ३३ वर्ष आहे तर त्याची नववधू केवळ २२ वर्षांची आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.