नवी दिल्ली : हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
‘बँग बँग’ बॉलिवूडमधला आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा बनलाय. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाचं बजेट जवळपास १४० करोड रुपयांचं आहे. यामध्ये प्रमोशन आणि जाहिरातीच्या खर्चाचाही समावेश आहे.
‘फॉक्स स्टार स्टुडिओज’च्या बॅनरखाली बनलेल्या या जबरदस्त अॅक्शन आणि स्टंटस् असणाऱ्या सिनेमात हॉलिवूड अॅक्शन डिरेक्टर अँन्डी आर्मस्ट्राँगलाही सहभागी करून घेण्यात आलंय. आर्मस्ट्राँगनं ‘द अमेझिंग स्पायडरमॅन-२’मध्ये स्टंट डिरेक्शनचं काम केलंय.
या सिनेमाच्या ४५०० हून अधिक प्रिंटसोबत हा सिनेमा उद्या सिनेमागृहांत दाखल होणार आहे. सिनेमाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला या सिनेमाच्या यशाची खात्री आहे. पण, तज्ज्ञांच्या मते या सिनेमाचा खर्च पाहता पहिल्या तीन दिवसांत चांगली कमाई करणं गरजेचंच आहे...
या सिनेमात हृतिकसोबतच कतरिनानंही आपला अॅक्शनचा जलवा दाखवलाय. सिनेमाचा ट्रेलर सुपरहिट ठरलाय. कतरिना-हृतिकची जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.