मुंबई : यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत.
सलमान खान एका एपिसोडसाठी ६-८ कोटी रुपये चार्ज करतो. तसेच या घरातील सदस्यांनाही चांगला पैसा मिळतो.
सदस्यांना आठवड्याला मिळणारी रक्कम
बॉटम लेव्हल -
या शोमध्ये सर्वात कमी लोकप्रिय असलेल्या व्यक्तीला दर आठवड्याला ३ लाख रुपये मिळतात. उदा. अरविंद वघेडा याबद्दल कोणालाही जास्त माहिती नाही आहे.
मिडल लेव्हल -
या लेव्हलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय येत नाही पण बॉटम लेव्हलपेक्षा जरा जास्त प्रसिद्ध असलेल्या लोकांचा समावेश होतो. अशा व्यक्तींना ४ लाख रुपये प्रत्येक आठवड्याला मिळतात. यात रॉशेल राव, युविका चौधरी आणि विकास भल्ला यांचा समावेश होतो.
टॉप लेव्हल -
यात सर्वात लोकप्रिय सदस्यांचा समावेश होतो. त्यांना दर आठवड्याला ५ लाख रुपये देण्यात येतात. त्यात रिमी सेन, अमन वर्मा, प्रिन्स नरुला यांचा समावेश होतो.
स्पेशल फी
तसेच ड्रामा करणारे तसेच शो रोचक करणाऱ्यांना स्पेशल फी देण्यात येत. शोचे निर्माते हे निश्चित करीत असतात.
बक्षिस वेगळे
आठवड्याला मिळणाऱ्या रक्कमेव्यतीरिक्त बक्षिसाची रक्कम वेगळी मिळते. १५ आठवडे बिग बॉसच्या घरात राहिलेल्या व्यक्तीला ५० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येते. कर कपात होऊन ३९,६६,६७७ हाता पडतात. ही रक्कम सुमारे ४० लाखांच्या आसपास जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.