मुंबई: रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'च्या घरातून बाहेर पडलेला अभिनेता पुनीत वशिष्ठनं सलमान खानवर पक्षपात करत असल्याचा आरोप लावलाय. पुनीत वशिष्ठनं म्हटलं, सलमान खान मंदना करिमीच्या सौंदर्यावर फिदा झालाय.
आणखी वाचा - Bigg Boss 9: भावाच्या मृत्यूमुळे किथ सिक्वेराने मध्येच सोडले घर
पुनीत पुढे म्हणाला, 'सलमान पूर्णपणे भेदभाव करतात आणि ते मंदनाचं दुहेरी रूप पाहत नाही.' बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुनीतनं मीडियाला सांगितलं की, 'सलमान फक्त मंदनाचं बाहेरील सौंदर्य पाहतो. ती कशी आहे आणि ती काय करते हे तो पाहत नाही'
आणखी वाचा - बिग बॉस-९ : किथ सिक्वेराची पत्नी समयुक्ता सिंग हिची वाईल्ड कार्डने एंट्री?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून पुनीत वशिष्ठ आला होता. मात्र तो जास्त दिवस घरात टिकू शकला नाही आणि १५ नोव्हेंबरला बाहेर पडला. पुनीतनं या आठवड्यात मंदनाला विदेशी म्हटलं होतं. ज्यानंतर सलमान त्याच्यावर बरसला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.