बिपाशा - करणची मालदीवमध्ये मस्ती!

'अलोन' या सिनेमात दिसल्यानंतर बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांची मैत्री भलतीच पक्की झालीय. सध्या हे दोघे मालदीवच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत.

Updated: Jul 29, 2015, 11:53 AM IST
बिपाशा - करणची मालदीवमध्ये मस्ती! title=

मुंबई : 'अलोन' या सिनेमात दिसल्यानंतर बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांची मैत्री भलतीच पक्की झालीय. सध्या हे दोघे मालदीवच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत.

करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट फोटोज शेअर केलेत. यामधूनबिपाशा आणि करण यांनी एकमेकांची कंपनी बरीच एन्जॉय केलेलीही दिसतेय.


बिपाशा मालदीवमध्ये

या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा केव्हा हे दोघे बाहेर जातात तेव्हा तेव्हा मित्र-मैत्रिणीही सोबतीला असतात. या ट्रीपमध्येही दोघांचे फ्रेन्डस त्यांच्यासोबत होते. 


करण मालदीवमध्ये

सध्या, मालदीव आपला ५० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे... आणि या सोहळ्यात बिपाशा आणि करणही सामील झाले. 


बिपाशा - करण फ्रेन्डससोबत

या दोघांचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे बाहेर फिरायला गेल्यावर आपल्या मस्तीचे फोटो हे दोघेही आवर्जुन सोशल मीडियावर शेअर करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.