पॉर्न चित्रपटाचा हट्ट धरल्याने, पतीची अभिनेत्रीकडून हत्या

चित्रपट सृष्टीत नेहमीच आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. बालकलाकाराच्या भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी, अभिनेत्री श्वेता प्रसाद यांना देहव्यापाराच्या धंद्यात अटक झाल्यानंतर, एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Sep 9, 2014, 05:58 PM IST
पॉर्न चित्रपटाचा हट्ट धरल्याने, पतीची अभिनेत्रीकडून हत्या title=

मुंबई : चित्रपट सृष्टीत नेहमीच आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. बालकलाकाराच्या भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी, अभिनेत्री श्वेता प्रसाद यांना देहव्यापाराच्या धंद्यात अटक झाल्यानंतर, एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीने पॉर्न चित्रपटात काम करण्यास जबरदस्ती केल्याने, चेन्नईत एक अभिनेत्रीने आपल्या पतीची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी २२ वर्षांची अभिनेत्री श्रुती चंद्रलेखा, हीला आपल्या दोन साथीदारांसह अटक केली आहे.

अभिनेत्रीने दावा केला आहे की, तिचा पती एस रोनाल्ड पेटर एक बिझनस मन होता. जेव्हा त्याला त्याच्या ऑनलाईन बिझनेसमध्ये खूप तोटा झाला. 

तेव्हा त्याने तिला पॉर्न चित्रपटात ढकलण्यास सुरूवात केली. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी या अभिनेत्रीने मित्रांच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली.

आपल्या पतीची हत्या केल्यानंतर चंद्रलेखा फरार झाली, पण गुरूवारी पोलिसांनी तिला बंगळुरूच्या घरी अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.