आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना रंगेहात अटक

अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक करण्यात आलीय. 

Updated: Sep 9, 2014, 02:40 PM IST
आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना रंगेहात अटक title=

नवी दिल्ली : अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक करण्यात आलीय. 

पोलिसांनी दक्षिण सिनेमांतील अभिनेत्री दिव्या श्री हिला देहविक्रीत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केलीय. तेलगू सिनेमा 'बीटेक बाबू' या चित्रपटात दिसलेल्या दिव्या श्री हिला पोलिसांनी देहविक्री करताना रंगेहात अटक केलीय. गंटूरमधल्या एका घरातून दिव्या श्री हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छापा मारून दिव्या हिला पुराव्यासहीत अटक केलीय. पोलिसांनी ज्या घरावर छापा मारला तिथं दिव्या श्री हिच्याशिवाय इतर अभिनेत्री आणि मॉडलही उपस्थित होत्या. 

पोलिसांनी दिव्यासोबतच अभिनेता पवन कुमार, चंदू आणि सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतरांनाही अटक केलीय.  

दिव्या हिनं 2000 साली 'हनुमान जंक्शन' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दिव्यानं जवळपास 14 सिनेमांत काम केलंय.

धक्कादायक म्हणजे, गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती बाल अभिनेत्री म्हणून ओळख मिळवणाऱ्या श्वेता बसू हिला अटक झाल्यानंतर पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.