Kanchenjunga Express Accident In Darjeeling: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दार्जिलिंग जिल्ह्यामधील न्यू जलपायगुडी येथे रंगापानी स्थानकाजवळ कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तसेच या अपघातात 60 प्रवासी जखमी झाले आहेत. तातडीनं बचाव पथकं आणि मदतकार्य करणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेसंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. (येथे क्लिक करुन पाहा भीषण अपघाताचे धक्कादायक फोटो)
अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक पोलीस निरिक्षकांना घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर आणि मदतकार्यासाठी बचाव पथकेही घटनास्थली पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर मतदाकार्य सुरु आहे. रंगापानी स्थानकाजवळ हा अपघात झाला असून रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनीही या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.
रेल्वेच्या बचाव पथकांबरोबरच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदतकार्यसाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured
Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0
— ANI (@ANI) June 17, 2024
घटनास्थळी पोहोचले दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनास्थळावरील परिस्थिती चिंताजनक आहे. एक मालवाहू ट्रेन कांचनजंगा एक्सप्रेसवर आदळल्याने हा अपघात झाला."
नक्की वाचा >> भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम
या ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, "मी बी 1 डब्यातून प्रवास करत होतो जेव्हा ट्रेनचा अपघात झाला. मला बाहेर काढण्यात आलं असून माझ्या डोक्याला मार लागला आहे," असं सांगितलं.
#WATCH | Ruidhasa, Darjeeling | A passenger of Kanchenjunga Express train says, " I was travelling in B1 coach when the train was hit. I have been rescued, I have suffered an injury on my head." pic.twitter.com/A0PcZJ01mF
— ANI (@ANI) June 17, 2024
रेल्वेने या अपघाताची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी तातडीने एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
West Bengal | Sealdah Eastern Railway sets up a control desk at Rangapani station after the Kanchenjunga Express train rammed by a goods train at Ruidhasa in Darjeeling district pic.twitter.com/KLOY7Jn8rB
— ANI (@ANI) June 17, 2024
हा ट्रेनचा अपघात एवढा भीषण होता की अनेक डबे एकमेकांवर चढल्याचं चित्र घटनास्थळी आहे. दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.