मुंबई : नुकताच दहावी-बारावीचा रिझल्ट जाहीर झाला. यात अनेकांना चांगले यश मिळाले तर काहींना अपयश मिळाले. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याला सामोरे जाण्याचा सल्ला सैराटमधील अक्का म्हणजेच छाया कदम यांनी दिलाय.
परीक्षेत अपयश आले की काही विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र अपयशावर मात करण्याचा हा मार्ग नसल्याचे छाया कदम म्हणतात.
अभ्यास, मार्क हे सर्वस्व नाही मित्रांनो, याचा अर्थ अभ्यास करू नये अस नाही. पण मार्क कमी मिळाले म्हणून हिरमसून जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका एवढेच सांगायचे आहे. वेगवेगळी क्षेत्र आपली वाट बघत आहेत, असा संदेश छाया कदम यांनी दिलाय.