रणवीरच्या प्रश्नांवर दीपिका नाराज का होते?

चित्रपट 'फाइंडिंग फॅनी'च्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोणला, जेव्हा रणबीरबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती नाराज दिसली. सध्या रणवीर सिंह जोया अख्तरचा चित्रपट 'दिल धडकने दो'साठी काम करतोय, आणि चर्चा अशी आहे की दीपिका पुन्हा पुन्हा या सेटवर जात असते.

Updated: Aug 14, 2014, 02:14 PM IST
रणवीरच्या प्रश्नांवर दीपिका नाराज का होते? title=

मुंबई : चित्रपट 'फाइंडिंग फॅनी'च्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोणला, जेव्हा रणबीरबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती नाराज दिसली. सध्या रणवीर सिंह जोया अख्तरचा चित्रपट 'दिल धडकने दो'साठी काम करतोय, आणि चर्चा अशी आहे की दीपिका पुन्हा पुन्हा या सेटवर जात असते.

दीपिकाला याविषयी विचारल्यावर दीपिका म्हणाली, 'ही बाब इथं महत्वाची नाही, याचं उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, या विषयी मी नंतर बोलेन'

'फाइंडिंग फॅनी'मध्ये रणवीर सिंह ही एक छोटीशी भूमिका करतोय, हे विचारल्यावर दीपिका म्हणाली, मला रणवीरच्या भूमिकेबद्दल काही माहिती नाही, याची माहिती तुम्हाला दिग्दर्शक देऊ शकतील. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसल्याचंही दीपिकाने म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.