सलमानला अटक... पाकिस्तानच्या हद्दीत घुसला!

अभिनेता सलमान खान सध्या राजस्थानच्या झुंझनूमध्ये आपल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या शूटींग दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्यानं सलमानला अटक करण्यात आली...

Updated: Jan 8, 2015, 06:00 PM IST
सलमानला अटक... पाकिस्तानच्या हद्दीत घुसला! title=

मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या राजस्थानच्या झुंझनूमध्ये आपल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या शूटींग दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्यानं सलमानला अटक करण्यात आली...

थांबा... थांबा... हे खरंखुरं नाही तर सिनेमातील एका सीनमध्ये घडतंय. या सीनमध्ये सलमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसतोय... इथं त्याच्यासोबत अनेक गैरप्रकार घडतात... आणि त्यानंतर त्याला अटकही केली जाते. 

यामध्ये त्याची कॉलर पकडून त्याला यथेच्छ मार दिला जातो.... आणि सलमान काहीही करू शकत नाही... ही संपूर्ण कथा तुम्हाला 'बजरंगी भाईजान'मध्ये पाहायला मिळेल. या सिनेमाचं शूटींग सध्या मांडवामध्ये सुरू आहे.

या सिनेमाच्या शूटींगसाठी मांडवा इथल्या रेतीले भागाचं रुपचं पालटण्यात आलं होतं. या भागाला पाकिस्तानच्या एका गल्लीचं रुप देण्यात आलं तसंच त्याच्या दोन्ही बाजुंना उंटांना उभं करण्यात आलं. यावेळी, सलमानच्या गळ्यात एक बॅग लटकवलेली दिसतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.