रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत?

बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Jun 16, 2015, 11:40 AM IST
रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत? title=

मुंबई : बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही घरच्या मंडळींनी लग्नाला परवानगी दिली आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या लव्हस्टोरीची आणि साखरपुड्याची चर्चा सगळीकडे आहे. मात्र, याबाबत दोघांनीही मौन पाळले आहे. भन्साळींच्याच सध्या चित्रीकरण सुरू असलेल्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठीही दीपिका आणि रणवीर पुन्हा एकत्र आले आहेत. 

'दिल धडकने दो‘च्या वेळी रणवीरची भेट घेतली असता, त्याने यावर काहीही भाष्य केले नाही. उलट दीपिकाचा विषय काढताच त्याने विषयाला बगल दिली. परंतु, आता एका वेबसाइटने २०१६ मध्ये या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची बातमी दिली आहे, त्यासाठी फेब्रुवारीतील मुहूर्त काढल्याचेही म्हटले आहे. या दोघांनी संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला‘ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.